गोपाळपूरच्या श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या ३० विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड!

Views
Views:
आत्तापर्यंत ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये तब्बल ३३६ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड
पंढरपूरः- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हीवद्वारे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये ३० विद्यार्थ्यांची निवड झाली असून आत्तापर्यंत टी.सी.एस. मध्ये स्वेरीचे एकूण ३३६ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

         आंतरराष्ट्रीय कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने टीसीएस निंजा एन.क्यू.टी (नॅशनल कॉलीफायर टेस्ट) या देशपातळीवरील ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे स्वेरीच्या तब्बल ३० विद्यार्थ्यांची निवड केली. एच आर. प्रमुख मनदीप बागची, एम. कला, इंशा शेख तसेच त्याचबरोबर १५ जणांच्या तांत्रिक पॅनल निवड समितीने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त,आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील किरण गायकवाड, रोहित बनकर, गुरुप्रसाद बडवे, रुपेश बंडगर,अजय गोडसे, शुभम भोसले व अशोक मुळे असे ७ विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या पायल भोसले, निशिगंधा पाटील, मयुरेश अढवळकर, वैष्णवी अवताडे, भगवती कोरे, मोक्षदा अनंतपुरे व प्रियांका धोत्रे ह्या ७ जणांचे तर कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग विभागातील संजीवनी पवार, प्रियांका आसबे, शुभम पाटील ,धानेश स्वामी, राधिका बहिरट, आदिती मलिकपेठकर, प्रियांका मुळे, शरयू कांबळे, पूजा वेळापुरे, सोनाली चव्हाण, अजिंक्य घोडके, ओंकार बोराडे, संकेत कुलकर्णी, सौरभ तेंडूलकर, समाधान जगदाळे, पार्वती दगडे हे सोळा विद्यार्थी असे मिळून स्वेरीच्या एकूण ३० विद्यार्थ्यांची निवड  टीसीएस कंपनीत करण्यात आली. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसमध्ये गतवर्षी पर्यंत ३०६ एवढी विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली होती त्यात आता या नवीन ३० विद्यार्थ्यांची भर पडली असून टीसीएस कंपनीत आता विक्रमी ३३६ जणांची वर्णी लागली आहे. या निवडीवर प्रतिक्रिया देताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व निवड प्रक्रियेचे प्रमुख मनदीप बागची म्हणाले की, ‘येथील शिस्तबद्ध विद्यार्थी पाहून आमच्यातील प्रत्येकजण प्रभावित झाला असून प्रचंड मेहनत करून येथील विद्यार्थी भविष्यात खूप प्रगती करणार असून उद्याचा भारत घडवीत आहेत. अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व त्यांच्या टीमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.’ टीसीएसमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विशेषतः पालक वर्गात मात्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकूणच स्वेरीत मिळणाऱ्या संस्कारामुळे विद्यार्थी प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ यांच्या नेतृत्वाखाली प्रा. एस. व्ही.दर्शने, प्रा.डी.ए.कुंभार आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले असून संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडा तसेच स्वेरी व्यवस्थापनातील इतर सहकारी,स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तीनही महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments