प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा कॅप राऊंड-१ शनिवारपासून सुरु

Views
Views:

     ८ जुलै पर्यंत चालणार प्रक्रिया
पंढरपूरः-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी (पदवी) ऑनलाईन प्रवेश प्रकियाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) शनिवार, दि. ६ जुलै २०१९ पासून सुरु होणार असून ती सोमवार,८ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. स्वेरीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन कॅप राउंड ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. याची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर बुधवार, १० जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.’ अशी माहीती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली. 

         सन २०१९-२०च्या पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणेभरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी,पडताळणीअर्ज कायम करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता येत्या शनिवार (दि.६ जुलै) पासून ते सोमवार (दि. ८ जुलै) पर्यंत प्रवेशाच्या  पहिल्या फेरी (कॅप राउंड-१) ला सुरवात होत आहे. यामध्ये आपल्याला योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याची निवड करावी लागणार आहे. यासाठी विशेष अभ्यास करून कॅप राऊंड- १ चे ऑप्शन फॉर्म ऑनलाइन भरावेत. महाविद्यालय निवडताना, महाविद्यालयात होणारी प्रवेश संख्या, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापकवर्ग याचा प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे. या महत्वाच्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पुरेसा अवधी आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करावी. कॅप राउंडच्या या तीन दिवसात आपला निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सर्व बाजूंनी विचार करून योग्य महाविद्यालयाची निवड करावी. चार वर्षे मौज मजा करण्यापेक्षा चार वर्षे परिश्रम करून घेणाऱ्या महाविद्यालयाची निवड करावी, जेणेकरून भविष्यकाळ सुखाचा व समृद्धीचा जाईल. सर्व ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे (९५४५५५३७७४)स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८) प्रा. यु. एल. अनुसे (९१६८६५५३६५) व प्रा. पी. के. भुसे (९२८४०७७०८०) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.पदवी अभियांत्रिकीच्या ऑलाईन प्रवेशासाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर व कॅम्पस प्लेसमेंटच्या विक्रमी निवडीवर स्वेरीमध्ये अभूतपूर्व गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments