अ.भा.युवक मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांची निवड नागेश भोसले व जिल्हाध्यक्ष सुरज भोसले यांच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार

Views
Views:
अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली असून या मध्ये सचिन गांडुळे(जिल्हा संघटक),सौरभ पवार (विद्यार्थी तालुका अध्यक्ष),भिमराव भुसे(रिक्षा तालुका अध्यक्ष),विशाल गव्हाणे(विद्यार्थी तालुका अध्यक्ष),गणेश गांडुळे(तालुका संघटक),नामदेव भोसले(तालुका सचिव) यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.या वेळी या नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार मर्चंटस को-ऑप बँकेचे चेअरमन नागेश भोसले व जिल्हाध्यक्ष सुरज भोसलेयांच्या हस्ते करण्यात आला.
     यावेळी बोलताना चेअरमन नागेश भोसले म्हणाले की,नुतन पदाधिकार्‍यांनी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या व समाजबांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी परिश्रम घ्यावेत.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्षसुरज भोसले म्हणाले की,संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करताना संघटनेचे पाळेमुळे आणखी रुजवून तळागाळातील समाजबांधवांना न्याय मिळवून देण्याचे काम आपणास करावे लागेल.
     यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रशांत गुटाळ,जिल्हा उपाध्यक्ष नागेश बागल,तालुकाध्यक्ष सुमित शिंदे,तालुका उपाध्यक्ष आप्पाराव मस्के,तालुका विभाग प्रमुख राजेंद्र नागटिळक,तालुका सरचिटणीस दिपक नागणे,तालुका कार्याध्यक्ष आण्णा पवार,शहराध्यक्ष आनंद शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments