राष्ट्रीय पातळीवरील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ पुरुस्काराने स्वेरीला सन्मानित,

Views
Views:
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर या शिक्षण पंढरीला राष्ट्रीय पातळीवरील सेंटर ऑफ एक्सलन्स पुरुस्काराने सन्मानित करण्यात आले असून स्वेरीला यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले असून स्वेरीच्या शिरपेचात या राष्ट्रीय पुरस्काराने आणखी एक मानाचा तुरा खोवला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.

              सन १९९८ साली स्थापन झालेली गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर ही शैक्षणिक संस्था मजल-दरमजल करत रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात होत असताना शैक्षणिक स्पर्धेत अनेक नवनवीन उपक्रम राबवत आहे. स्वेरीत शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी बौद्धिक क्षमतेच्या जोरावर उच्च स्थानी कसा पोहचेल ? यासाठी परिश्रम घेत आहेत. याचाच परिणाम म्हणून आज अनेक विद्यार्थी यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी अशा स्पर्धा परीक्षा यशस्वी होवून प्रशासकीय सेवेत रुजू होत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करताना विकासाच्या दृष्टीने अनेक शैक्षणिक, विधायक , सामाजिक आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात स्तुत्य उपक्रम राबवित आहेत आणि याच उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या अथक परिश्रमाने, नवनवीन उपक्रमाने ‘स्वेरी’ला महाराष्ट्रातील अग्रमानांकित शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक निर्माण करून शैक्षणिक दृष्ट्या राज्यात ‘पंढरपूर पॅटर्न’ ची स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. एकूणच स्वेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थी सतत प्रयत्नशील असतात आणि याच स्वेरी शिक्षण संस्थेला दि.२७ एप्रिल २०१९ रोजी ‘जीसीएस परिषद- २०१९’ मध्ये बंगलोरच्या हॉटेल ग्रँड शेरेटनमध्ये संपन्न झालेल्या शाही सोहळ्यात स्वेरी या संस्थेस ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वेरीतील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची दखल घेवून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. स्वेरी शिक्षण संस्थेच्या वतीने बारामतीचे प्रख्यात वक्ते प्रा. राजकुमार कदम यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स हा पुरस्कार स्विकारला. महाराष्ट्रामधून केवळ ‘स्वेरी’ या एकमेव शिक्षण संस्थेस हा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी स्वेरीला एन.बी.ए, नॅक, आय. एस. ओ, ९००१:२०१५, इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स (कोलकाता), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा उत्कृष्ठ महाविद्यालयाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले असून आता यामध्ये "सेंटर ऑफ एक्सलन्स" या राष्ट्रीय पुरस्काराची भर पडली आहे. यामुळे राज्यातून स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी रोंगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारताचे माजी सर न्यायाधीश पद्मविभूषण एम. एन. व्यंकटचलय्या, सुराणा इन्स्टिटयूटचे प्रमुख दीपक सुराणा आणि ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री डॉ एस. किरणकुमार अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

Post a Comment

0 Comments