संभाजीराजे फेम अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Views
Views:
पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या संधीचा अभिमान – डॉ. अमोल कोल्हे
शिवसेनेचे उपनेते डॉ. Dr.Amol Kolhe यांनी शिवबंधन तोडून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना मला अतिशय आनंद होतो आहे. कारण देशाच्या राजकारणाला एक सकारात्मक आणि विधायक दिशा देण्याची क्षमता, अनुभव,  जाण आणि जाणीव ज्या नेत्यामध्ये आहे अशा आदरणीय Sharad Pawar साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते हे मी भाग्य समजतो आणि या संधीचा मला अभिमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाद्वारे पक्ष आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहू,’’ अशी ग्वाही डॉ. अमोल कोल्हे यांनी या वेळी दिली.

Post a Comment

0 Comments