राजेंद्र गुंड यांना आ.बबनरावजी शिंदे राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्कार जाहीर

Views
Views:
माढा : तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील पञकार राजेंद्रकुमार बाळू गुंड यांना राहुल सार्वजनिक वाचनालय व कर्मवीर आ. बबनरावजी शिंदे प्रतिष्ठान शिंदेवाडी यांच्या वतीने दिला जाणारा सन -2019 चा आ. बबनरावजी शिंदे राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण रविवार दिनांक 24 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शिंदेवाडी ता.माढा येथे होणार आहे. या पुरस्काराचे वितरण आ. बबनदादा शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
विठ्ठलवाडीचे राजेंद्र गुंड यांनी आपल्या लेखणीतून सामाजिक, शैक्षणिक,कृषी,राजकीय व इतर  क्षेत्रातील विषय प्रभावीपणे मांडले आहेत.अनेक समाजोपयोगी प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी आपल्या लेखणीतून केले आहे. याचीच दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील वर्षी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमाच्या बातम्यांना योग्य न्याय दिल्याबद्दल त्यांचा माढा तालुका पाणी फाऊंडेशनच्या टीमने प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान केला आहे. राजेंद्र गुंड यांना रयत शिक्षण संस्थेच्या माढा काॅलेजचा सन 1996 साली आदर्श विद्यार्थ्यी पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून अध्यापनाचे उत्कृष्टरित्या काम केल्याबद्दल माढा रोटरी क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार, डाॅ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषदेचा महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे तसेच महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे याचबरोबर त्यांना बीडचा ज्ञानमिञ पुरस्कार व राज्यस्तरीय कलाअध्यापक व उपक्रमशील शिक्षक अशा अनेक पुरस्काराने वेळोवेळी सन्मानित केले आहे.
राजेंद्र गुंड यांना त्यांच्या कारकिर्दीत आदर्श विद्यार्थ्यी, आदर्श शिक्षक आणि आत्ता राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या प्रत्येक क्षेत्रातील यशाचा आलेख चढता आहे. 
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अमोल नाना चव्हाण,निलकंठ पाटील,पोलिस अधीक्षक सचिन कदम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अतुल भोस,इंडियन शुगरचे संचालक संदीप पाटील,उपसभापती बाळासाहेब शिंदे,मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष सुहास पाटील,संचालक हनुमंत पाडूळे,झुंझारनाना भांगे,आनंद कानडे, प्रा.राजेंद्र दास,इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, अशोक चव्हाण,माजी उपसभापती उल्हास राऊत,कृषी सहाय्यक अनिलकाका देशमुख, नितीन कापसे, सरपंच संदीप पाटील,बालाजी गव्हाणे, उपशाखाप्रमुख मोहन कदम, चेअरमन अनिलकुमार अनभुले, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे, समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव, विक्रीकर अधिकारी संतोष नागटिळक, प्रा.नेताजी कोकाटे,डाॅ.मोहन शेगर,  वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,पोलिस पाटील बालाजी शेगर, सतीश गुंड यांच्यासह माढा प्रेस क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे
.

Post a Comment

0 Comments