लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये होणार मतदान

Views
Views:
2019 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून, महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार येणार असल्याचे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज स्पष्ट केले. देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार असून, 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहत होते. देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, निवडणुकीच्या धामधुमीला खऱ्या अर्थाने आता  सुरवात झाली आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होत आहे. गोव्यातील दोन्ही जागांवर 23 एप्रिलला मतदान होत आहे.
महाराष्ट्रातील निवडणुका पुढीलप्रमाणे

  1. - पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 मतदारसंघात मतदान
  2. - दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 मतदारसंघात मतदान
  3. - तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांवर मतदान
  4. - चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांवर मतदान

Post a Comment

0 Comments