सत्ता परिवर्तन करण्याची ताकद धनगर समाजात आहे, मतांचे राजकारण करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांनी चिंतन करावे - कल्याणी वाघमोडे.

Views
Views:
बारामती -  15 जुलै ते 29 जुलै 2014 रोजी झालेल्या पंढरपूर - बारामती पदयात्रा व धनगर आरक्षण आंदोलनादरम्यान उपोषण सोडतेवेळी, पहिल्याच कॅबिनेट मध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊ म्हणणारे  निर्णय घेऊ म्हणणारे आजचे मुख्यमंत्री आता साडे चार वर्ष झाले तरीही काहीही करु शकले नाहीत.हाती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले नाही,म्हणून समाजामध्ये प्रचंड रोष आहे.
  • व्हिडीओ पहा
मागील वर्षी ०५ नोव्हेंबर २०१७ ला नागपूर येथे मुख्यमंत्री महोद्ययांनी धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्दयाला बगल देत सोलापुर विद्यापीठाला पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ नाव देण्याचे जाहीर केले. आणि ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत टीस चा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाईल, असे परत एकदा आश्वासन दिले परंतु तीही वेळ आता निघुन गेली आहे.
गेली साडे चार  वर्ष आम्ही या फसव्या सरकारची हवेतील आश्वासने ऐकत आहोत.
२०१८ संपले आता  २०१९ मध्ये केंद्र व राज्याच्या निवडणुका लागणार . त्यामुळे काहीतरी प्रस्ताव पाठवण्याचे व धनगर समाजाला भावनिकतेवर स्वार करुन मतदान लाटण्याचे षडयंत्र बीजेपी सरकारचे होते का??  असे म्हणावे लागेल . आधीच्या सरकारने जाणीवपूर्वक धनगर समाजावर अन्याय केला म्हणुन 2014 ला भाजपा ला बहुमत मिळाले.सर्वच पक्ष आता या मुद्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न करित आहेत. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये याचा फटका सर्वच राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे.
खरी नैतिकता असेल तर 5 मार्च रोजी सरकारने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावेत. अन्यथा हा समाज फसवणूक करणाऱ्या सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
तसेच सम्पुर्ण महाराष्ट्रात समाजाच्या न्याय हक्कासाठी समाज जागृती करुन मोठा दबावगट तयार करण्यात येणार आहे.

धनगर समाजाच्या मुद्दयांवर  मतांचे राजकारण करणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांनी चिंतन करावे, आणि पुढील काळात धनगर समाजाची मते गृहीत धरू नयेत,  असे परखड मत कल्याणी वाघमोडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी पाचव्या दिवशी प्रांत अधिकारी यांनी भेट देऊन मागण्या सरकारकडे पोहचविण्याचे आश्वासन दिले.
आज सातव्या दिवशी संध्याकाळी नायब तहसीलदार रमेश पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडून जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी समाजाचे बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बजरंग गडदे,  नारायण तिडके, विनोद गडदे, मंदाकिनी घुले, सुनीता पिंगळे, मंजुळाताई रूपनवर, संगीता गडदे, नीलिमा मलगुंडे, सुजित वाघमोडे, महेंद्र वाघमोडे, योगेश बच्छाव,  संदीप चोपडे, पोपट घुले, देविदास दुबेले, सतीश शेंडगे, कुलदीप डोंबाळे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments