राफेलच्या फाईल गायब झाली म्हणजे त्यात काहीतरी काळेबेरे होते राहुल गांधी यांचा मोदींवर निशाना

Views
Views:

पाच वर्षात शेतमालाचा दर ज्या प्रमाणे गायब झालाय राफेलच्या सौद्याच्या फाईल्‍स गायब झाल्‍या आहेत. राफेलच्या फाईल्‍स गायब झाल्‍या म्‍हणजे त्‍यात काही तरी काळेबेरे होतेअसा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच  फ्रान्सच्या माजी अध्यक्षांकडून थेट मोदींच्या सहभागाचा उल्‍लेख करण्यात आलेला आहे. असे असताना पंतप्रधान मोदींना वाचविण्यासाठीचा प्रयत्‍न सुरू आहेअसे ते म्‍हणाले. तसेच पंतप्रधानच राफेल प्रकरणी दोषी असून त्यांचे 'क्रिमिनट इनव्हेस्टिगेशन' झाले पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे . 
राफेल प्रकरणाच्या सुनावणीच्यावेळी या प्रकरणाच्या फाईल्स संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्या असल्याची माहिती काल सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली होती. त्यावरुन आज सकाळीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधानांनी राफेल डीलमध्ये समांतर बोलणी सुरू केली होती. त्यांनी अशी बोलणी का केली हाच खरा कळीचा मुद्दा आहे. त्याबाबतचा उल्लेख फाईल्समध्ये आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. जर या प्रकरणात काही तथ्य नसेल तर ते चौकशीला का घाबरत आहेत असा सवालही यावेळी राहुल गांधी यांनी केला.
अनिल अंबानी यांच्या खिशात तीसहजार कोटी रुपये घालण्यासाठीच पंतप्रधानांनी सर्व खटाटोप केला. त्यामुळे ते या प्रकरणात दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले. न्याय सगळ्‍यांना समान असावा. या प्रकरणाची चौकशी करा. तसेच मोदींचीही चौकशी करून त्‍यांच्यावर कारवाई करायला हवी असं राहुल गांधी यांनी म्‍हटलंय. तसेच अनिल अंबानींच्या फायद्यासाठी पंतप्रधान मोदींचा या डीलमध्ये प्रत्‍यक्ष सहभाग असल्‍याचा आरोप यावेळी त्‍यांनी केला.
  • पहा राहुल गांधींची पत्रकार परिषद 


Post a Comment

0 Comments