जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मोदी सरकार राजकारण करतय-शरद पवार

Views
Views:
नाशिक : जवानांनी एअर स्ट्राईक करून जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली, मात्र भाजप याचा राजकीय फायदा घेत आहे. भाजप नेत्यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवावा असे शरद पवार यांनी ठणकावले.
शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला आणी छाती कोण दाखवतंय असे म्हणत शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला. जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे राजकारण करण्यासाठी वापर केला जात असल्याचे शरद पवार म्हणाले.
निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा दुरूपयोग होत असल्याचे सांगताना शरद पवार यांनी मध्यप्रदेशात एका ठिकाणी EVM मशीनची तपासणी केली तर कोणतंही बटन दाबल्यावर कमळला मत जात होतं असं सांगितले. तसेच भंडारा गोंदिया मतदारसंघात तर 700 मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्याचेही शरद पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments