दगडूशेठ घोडके भाजपाकडून इच्छूक ! पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह विविध मंत्र्यांची घेतली भेट

Views
Views:
पंढरपूर - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सोलापूर राखीव मतदारसंघातून इच्छूक असणारे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती दगडूशेठ घोडके हे भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असून त्यांनी नुकतीच सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेवून भाजपाच्या तिकीटाची मागणी केलेली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दगडूशेठ घोडके यांनी यापूर्वी 1999 साली पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती व त्यावेळी त्यांना सुमारे 1 लाख मते पडलेली होती. त्यावेळी ही ते भाजपाकडून इच्छूक होते व त्यांना तिकीट मिळेल असे चित्र होते मात्र त्या निवडणूकीत मोहोळच्या नागनाथ क्षिरसागर यांना पक्षाने संधी दिली होती. भाजपाने पूर्वी मला दिल्लीमधून अटल बिहारी वाजपेयी व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी माझी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र पुणे येथे झालेल्या बैठकीत माझे तिकीट रद्द केले तरी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यानंतर ही मी अपक्ष निवडणूक लढविली होती त्यानंतर सुमारे 1 लाख मते घेतल्यामुळे वरिष्ठांनी माझे मुंबई येथील भाजपा दादर कार्यालयात कौतुक केले होते.
दरम्यान 20 वर्षानंतर आता दगडूशेठ घोडके हे पुन्हा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत असून त्यांनी याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यास अनेक राजकीय, सामाजिक नेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. घोडके यांनी यापूर्वी पंढरपूरचे नगराध्यक्षपद भुषविलेले आहे तसेच अनेक पदांवर त्यांनी काम केलेले आहे. शनिवारी घोडके यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची घेतलेली आहे. 
आता मात्र या निवडणूकीत पक्षाने मला उमेदवारी द्यावी. मला तिकीट दिले तर माझ्यासह संपूर्ण वडार समाज महाराष्ट्रामध्ये भाजपा- शिवसेना मित्र पक्ष युतीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील व त्याचा त्यांना निवडणूकीत फायदा होईल. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना मागील निवडणूकीत निवडून देण्यामध्ये माझा व वडार समाजाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी विजयी झाल्यानंतर माझेसह वडार समाजाचे कौतुक व अभिनंदन केले होते. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार निश्चित नाही त्यामुळे घोडके यांनी तिकीटाची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments