महाशिवरात्रीनिमित्त मोफत उसाचा रस व थंड पिण्याच्या पाण्याचे वाटप

Views
Views:
अखिल भारतीय युवक मराठा महासंघ सोलापूर जिल्हा चे जिल्हाध्यक्ष मा.श्री. सुरज (नाना) भोसले व मा.श्री. (नागेश काका) भोसले मित्र मंडळपंढरपूर यांच्यावतीने मु.पो.कोर्टी, ता.पंढरपूर येथील शिवमंदिरास दर्शनासाठी येणाऱ्या सर्व शिवभक्तांना मोफत थंडगार पिण्याच्या पाण्याचे व ऊसाच्या रसाचे वाटप करण्यात आले कोर्टी येथील प्रसिद्ध शिव मंदिरात शंभू-महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूर शहर व तालुका परिसरातून हजारो शिवभक्त येत असतात, मार्च महिन्याच्या या धगधगत्या उन्हामध्ये येणाऱ्या शिवभक्तांची तहान भागवणे व त्या माध्यमातून समाजसेवा करणे या उद्देशाने जिल्हाध्यक्ष सुरज नाना भोसले यांनी स्वखर्चातून शुद्ध आणि थंडगार पाण्याचे तसेच थंडगार ऊसाच्या रसाचे मोफत वाटप केले सकाळी १०:०० वाजल्यापासून सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चैतन्य भोगावकर, दिगंबर (नाना) वाळके, इस्माईल शेख, गणेश वगैरे, शरीफ शेख, विजय अरकीले, दिपक कवडे व महासंघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले रखरखत्या उन्हात थंड पाणी व उसाच्या रसाचा आस्वाद हजारो शिवभक्तांनी घेतला

Post a Comment

0 Comments