प्रकाश आंबेडकर सोलापुरातुन लढणार लोकसभा निवडणूक, सुशीलकुमार शिंदेंच्या अडचणीत वाढ

Views
Views:
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर कांग्रेस आघाडीसोबत जाण्याची शक्यता आता कमी झाली आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्याची आज घोषणा आज केली आहे. प्रकाश आंबेडकर हे आता वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदार संघाचे  उमेदवार असतील. त्यांनी ही घोषणा आज अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन केली.
आंबेडकरांनी त्यांचा पारंपारिक अकोला लोकसभा मतदारसंघ सोडून सोलापूरातून लोकसभा निवडणुक लढवण्याची घोषणा केल्याने मात्र, काँग्रेसचे नेते आणि सोलापूरचे  उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे.
त्याचबरोबर काँग्रेसने सोलापूर मतदारसंघातून सुशिलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली असल्याने आता प्रकाश आंबेडकर काँग्रेस राष्ट्रावादीसोबत येण्याची शक्यात कमीच आहे.

Post a Comment

0 Comments