रणजितसिंह मोहिते-पाटील भाजप मध्ये प्रवेश करणार का?

Views
Views:

  • रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे . माढ्याचे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील  हे चक्क भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. थेट विद्यमान राष्ट्रवादीच्या खासदाराचा सुपुत्राचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास हा मोहिते पाटलांसह राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे. दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे.
हे भेट त्यांच्या व्यक्तिगत कारणासाठी आहे की राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यासाठी आहे याची चर्चा माढा मतदार संघात सुरू आहे. सुजय विखे आज भाजप प्रवेश करणार आहेत . मात्र त्यांच्यासोबत रणजितसिंह मोहिते -पाटील हे  दिसल्याने रणजितसिंह मोहिते पाटील भाजप प्रवेश करणार का? याबाबत तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

Post a Comment

0 Comments