लोकसभा निवडणुकीपूर्वी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असे भाजप च्या नेत्यांनी दोन वर्षापूर्वी सांगितले होते - पवन कल्याण

Views
Views:
अमरावती (आंध्रप्रदेश) :  लोकसभा निवडणुकांआधी युद्धाचे वातावरण होईल, असं भाजपच्या नेत्यांनी मला दोन वर्षांपूर्वीच सांगितलं होते, असं खळबळजनक वक्तव्य दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी केले आहे.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून केलेल्या हवाई हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. यात आंध्र प्रदेशातील अभिनेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
पवन कल्याण यांनी सध्याच्या परिस्थतीबद्दल बोलताना म्हणाले, युद्ध कोणत्याही समस्येचे समाधान होणार नाही आणि युद्धामुळे दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. तसेच भाजपवर टीका करताना म्हणाले की, भाजप एकटाच देशभक्त असल्यासारखे वर्तन करत आहे. "देशभक्ती केवळ एकट्या भाजपचीच नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा 10 पटीने देशभक्त आहोत," असे सांगायला ते विसरले नाहीत.  
२०१४ च्या निवडणुकीत जनसेना पक्षाचे अध्यक्ष असलेले पवन कल्याण हे भाजपचे मित्रपक्ष होते. मात्र आता या पक्षाने भाजपची साथ सोडली आहे.  पवन कल्याण राजकारणासोबतच दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेत.

Post a Comment

0 Comments