किसान सन्मान योजनेचा पंढरपूरला शुभारंभ संपन्न

Views
Views:
पंढरपूर दि. 24 :-  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राष्ट्रीय पातळीवर शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गोरखपूर, उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा  तालुकास्तरीय शुभारंभ तहसिल कार्यालय पंढरपूर येथे करण्यात आला.

            प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या औपारिक समारंभास, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील,  तालुका कृषी अधिकारी एम.यु.कौलगी,  नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
              यावेळी तालुका कृषी अधिकारी कौलगी म्हणाले, शेती करण्यासाठी  शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्र शासन घेतला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना  सहा हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. ही मदत तीन टप्प्यात देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात  शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. तालुक्यातील आतापर्यंत 1500  शेतकरी पात्र ठरले असून, 27 हजार शेतकऱ्यांची माहिती शासनास सादर केली आहे.

             याप्रसंगी  तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र ठरलेल्या  10 शेतकऱ्यांचा औपाचरीकरीत्या सन्मान  करण्यात आला. यावेळी  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ  घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करुन जास्ती-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. कौलगी यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments