भारतीय वायुसेनेच्या जवानाला पकडल्याचा पाकिस्तानचा दावा

Views
Views:


पाकिस्तानने एक व्हिडिओ जाहीर केला असून त्यामध्ये अभिनंदन कुमार  या भारतीय वायुसेनेच्या जवानाला पकडल्याचा दावा केला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या भारतीय वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.
यात सर्वात चिंतेचा दावा म्हणजे एका भारतीय पायलटला अटक केल्याचं पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर गफूर यांनी म्हटलंय. भारताचे दोन विमान पाडले, एक काश्मीरमध्ये, तर दुसरं पीओकेमध्ये पाडलं, असा दावा पाकिस्तानने केलाय. विंग कमांडर अभिनंदन कुमार असं या पायलटचं नाव सांगत पाकिस्तानकडून व्हिडीओ जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे भारतीय हवाई दलाचा एक पायलट बेपत्ता असल्याचं हवाई दलातील सूत्रांचं म्हणणं आहे.
पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन कुमार असं नाव सांगत व्हिडीओ जारी करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये अभी नाव लिहिलेला पायलट दिसत आहे. पण या व्हिडीओच्या सत्यतेबाबत शंका आहे. कारण, भारताने अधिकृतपणे ही बाब अजून स्वीकारलेली नाही. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच भारताकडून भूमिका जाहीर केली जाऊ शकते.

Post a Comment

0 Comments