कल्याणराव काळे यांच्या मध्यस्थीने कार्यकर्त्याचे उपोषण माघे.

Views
Views:
पंढरपूर प्रतिनिधी - महावितरण व इलेकट्रॉपार्थचे ठेकेदार यांच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत  छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष हणमंत घाडगे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रविण घाडगे हे पंढरपूर येथील  महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. तीन दिवस उपोषणाची बसलेल्या दुर्लक्ष होत असल्याने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते व अधिकारी यांचेशी समन्वय साधत एक महिन्याच्या आत संबंधित कामाची चौकशी करून दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करू असे लेखी आश्वासन घेऊन  उपोषणकर्ते यांना लिंबू सरबत पाजून उपोषण सोडले. 

यावेळी ए.सी. इन्फ्राचे हिवरे, कार्यकारी अभियंता व्हनमाने, अभियंता मोरे,मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड, छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख समाधान सुरवसे, जिल्हाध्यक्ष धनराज लटके, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश माने, समाधान घाडगे, सुरज घाडगे, शहर अध्यक्ष राहुल डोंगरे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

    महावितरणच्या वतीने पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला येथे करण्यात आलेली कामे निकृष्ट स्वरूपाची झाल्याने वादळात व पावसात विधुत खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामात ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून महावितरणची फसवणूक केली आहे. त्यामुळे सदर कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी छावा संघटनेच्या पदाधिकारी यांनी महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. 

Post a Comment

0 Comments