जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान व औषोधोपचार शिबिराचे आयोजन, मोफत सर्वरोग निदान शिबिरात घेतला १६९० रुग्णांनी लाभ.

Views
Views:
पंढरपुर (प्रतिनिधी) दि.१७ - जनकल्याण हॉस्पिटल गरिबांचे आधारवड असून पंढरीच्या नगरीत अत्याधुनिक आरोग्यसेवा पुरविण्याबरोबर  ग्रामीण व शहरी नागरिकांच्या विश्वास संपादन करून खर्या अर्थाने जनकल्याण नाव सार्थ केले असल्याचे मत आमदार भारतनाना भालके यांनी व्यक्त केले. 

सहकार शिरोमणी वसंतराव (दादा) काळे यांच्या अमृतमहोत्सवी जयंती निमित्त वसंतदादा मेडिकल फाऊंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर यांचे वतीने  मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. उदघाटन आमदार भारत नाना भालके यांचे हस्ते करण्यात आले. 

यावेळी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या जयंतीनिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून ग्रामीण व शहरी भागातील गरीब  रूग्णांना आत्याधुनिक सेवा सुविधा पुरविण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

जनकल्याण हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल आजारांच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते असून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, व इतर योजनांच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांवर उपचार करण्यात आले, अत्यंत गरीब रुग्णांवर कमी दरामध्ये चांगल्या प्रकारची सेवा देऊन नागरिकांना आधार देण्याचे काम जनकल्याण हॉस्पिटलने केले असल्याचे डॉ.व्हि.एस.आपटे यांनी सांगितले .  

    याप्रसंगी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. कल्याणराव काळे, पंढरपूर नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.संग्राम गायकवाड, वसंतदादा काळे मेडिकल फौंडेशनच्या अध्यक्षा संगीताताई काळे,आय. एम.ए. अध्यक्ष डॉ. पंकज गायकवाड, धनंजय देशमुख, वसंतदादा मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधीर शिनगारे उपस्थित होते. दोन दिवस सुरु असलेल्या शिबिरात किडनी व मूत्र विकार १२८, पोटाचे विकार ८८, स्त्रीरोग चिकित्सा विभाग ११५, दंतरोग ५२, हृदयरोग १०५,  अस्थिरोग ४७, त्वचारोग ८७, नेत्र रोग २७१,  मेडिसीन विभागात ३१० रुग्णांवर उपचार करण्यात आले. एकूण १६९० रुग्णांची तपासणी   करण्यात आली. 

नेत्ररोग विभागातील रुग्णांना 165 रुग्णांना चष्मे वाटप करून 27 रुग्णांना ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला.  

    कार्यक्रमास समाधान काळे,महादेव देठे,तानाजी सरदार,नागेश फाटे,इब्राहिम मुजावर,सुधाकर कवडे,विष्णू यलमर, शहाजी साळुंखे,मोहन नागटिळक,अर्जुन जाधव,जयसिंह देशमुख, राजसिंह माने,दत्ता बागल,शकूर बागवान,बापू घंटी,मोहन नागटिळक, हणमंत मोरे,सुरेश देठे, हणमंत सुरवसे,विश्वंभर काशीद,अँड.राजेश भादुले, किरण घाडगे,संजय घोडके,संदीप मुटकुळे,डॉ.मिलिंद चौधरी,डॉ.आनंद कुलकर्णी, डॉ.महेश सुडके,डॉ सौ जयश्री शिनगारे, डॉ.रसिका  कुलकर्णी,डॉ.संजय पाटील, डॉ.अमित मेनकुदळे,डॉ.सागर गांधी, डॉ.शिंदे,डॉ.मनोज भायगुडे,डॉ.अमृता म्हेत्रे,डॉ.वैभवी भोसले,डॉ.अनिल काळे,डॉ.सत्यवान बागल,आणा डुबल,सद्दाम मणेरी,, तसेच विविध संस्थेचे पदधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनकल्याण हॉस्पिटल मधील कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर कवडे यांनी केले तर आभार भारत शिंदे यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments