भाजपाकडून डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी यांना उमेदवारी ?धर्मकारणाला राजकारणाची जोड अनाठायी

Views
Views:
सोलापूर लोकसभा मतदार संघातून गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी यांना भाजपाच्ुया वतीने उमेदवारी देण्याचे जवळपास निश्‍चित झाले असून डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामींच्या उमेदवारीमुळे या मतदार संघातील पारंपारिक भाजपा मतदारांबरोबरच लिंगायत मतदार भाजपाला मतदान करेल अशी आशा भाजपाला वाटते.मात्र सोलापूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या ग्रामिण मतदारांमध्ये डॉ.जयसिध्देश्‍वर यांच्या उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा होताना दिसून येत असून डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी हे धार्मिक गुरु आहेत.त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नितांत श्रध्दा आहे.मात्र धर्मकारण आणि राजकारण याची गल्लत करु नये.धार्मिक गुुरुंना उमेदवारी देण्याऐवजी ग्रामिण जनतेच्या,शेतकर्‍यांच्या कष्टकर्‍यांच्या प्रश्‍नाची जाण असलेला,जवळून अभ्यास असलेला उमेदवार द्यावा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
 या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना शुक्ल यर्जुवेदीय काण्व शाखेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बडवे म्हणाले की,सोलापूर लोकसभा मतदार संघातून डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु आहे.एक धार्मिक गुरु म्हणून त्यांच्याबद्दल राज्यभरात मोठया श्रध्देची भावना आहे.मात्र राजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केल्यानंतर या क्षेत्रातील टिकाटिप्पणी आणि जनतेच्या प्रश्‍नास न्याय न मिळाल्यास व्यक्त होणार्‍या प्रतिक्रिया यामुळे डॉ.जयसिध्देश्‍वर यांची प्रतिमा मलीन होऊ शकते.सोलापूर लोकसभा मतदार संघाचे सद्या प्रतिनिधित्व करणारे ऍड.शरद बनसोडे यांच्याबद्दल सद्या या मतदार संघात प्रचंड नाराजी आहे.दुष्काळामुळे ग्रामिण जनता होरपळून निघत असताना ऍड.बनसोडे यांनी मतदार संघाकडे पाठ फिरवली असल्याने संताप व्यक्त होत आहे.भाजपाबाबत असलेल्या नाराजीमुळेच भाजपाचा राजकिय चेहरा असलेला उमेदवार विजयी होणार नाही हे ओळखून भाजपाकडून डॉ.जयसिध्देश्‍वर यांच्या उमेदवारी पुढे करण्यात आली आहे.ज्यांच्या आशिवार्दासाठी शिष्यसमुदाय भक्तवर्ग गौडगाव मठात जावून नतमस्तक होतो त्या महाराजांना मतासाठी गावोगाव फिरावे लागणार ही बाब खटकणारी आहे.अशी प्रतिक्रिया यावेळी दत्तात्रय बडवे यांनी व्यक्त केली.
सोलापूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर,मंगळवेढा,मोहोळ,द.सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामिण जनतेचे प्रश्‍न वेगवेगळे आहेत.शेतकर्‍यांचा ऊसदाराचा प्रश्‍न असो,फळबाग अनुदानाचा प्रश्‍न असो अथवा इतर ग्रामिण जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न असोत या प्रश्‍नासाठी संघर्ष करणारे,संसदेत ठामपणे भूमिका मांडणारा लढाऊ प्रतिनिधी संसदेत जावा अशी अपेक्षा असताना धर्मगुुरुंना राजकारणात खेचून भाजपा राजकिय पोळू भाजून घेत आहे.असा आरोप दत्तात्रय बडवे यंानी केला आहे.

Post a Comment

0 Comments