वंचित बहुजन आघाडीची बैठक पंढरपूर येथे संपन्न

Views
Views:
पंढरपूर:- वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व युवक आघाडीची बैठक पंढरपूर येथे संपन्न झाली. बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर तालुक्यात संघटनेचे नेटवर्क वाढवुन गावपातळी पर्यंत संघटन पोहचवणे व राष्ट्रीय नेते अँड. बाळासाहेब आंबेडकर यांचेपाठीमागे खंबीरपणे मतदार उभा करणे या बाबत नियोजन करण्यासंबंधी राज्य उपाध्यक्ष  सुनिल वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी रिपब्लिक होलार परिषदेचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते एस. के. ऐवळे ( सर)होते.
बैठकीची सुरुवात . एस. के. ऐवळे यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.  यावेळी ऐवळे सर यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकि मध्ये राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर जे उमेदवार देतील तो निवडून आला च पाहिजे यासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता तन मन धनाने कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कार्य केले पाहिजे असे आवाहन केले. याप्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे  शहराध्यक्ष प्रकाश दुपारगुडे,      एमआयएमचे अध्यक्ष शहराध्यक्ष जुबेर बागवान, भारतीय बौद्ध महासभेचे  आर. वाय. सुरवसे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य  बी. आर. भोसले, प्रा. रवींद्र रणदिवे, भारिपचे तालुका अध्यक्ष ऍड. सुरेश कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
सदर बैठकीस राजकीय विश्लेषक प्रा. धैर्यशील भंडारे,  पत्रकार श्रीकांत कसबे, , प्रशांत ऐवळे ,रवि सर्वगोड, शामराव गायकवाड, उमेश वाघमारे यांचेसह वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व युवक आघाडी आणि एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष योगेश मोरे यांनी केले तर आभार  सोनबा वाघमारे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments