कर्मवीर आण्णांच्या विचाराचा वसा आणि वारसा रयत सेवकांनी जोपासावा - डॉ. अनिल पाटील

Views
Views:
पंढरपूर: दि. “ कर्मवीर आण्णा म्हणायचे ‘उडणाऱ्या पक्षाचे पंख कापायचे नसतात, पक्षी आकाशात भरारी घेऊन परत तो आपल्या घरट्यात येतो.’ रयत शिक्षण संस्थेतला प्रत्येक सेवक रयतेची संस्कृती जपत असतो. प्राचार्य डॉ. बचुटे यांनी रयत संस्कृती काम करताना सांगोला महाविद्यालयात रुजवावी. आज रयत शिक्षण संस्थेच्या तीन महाविद्यालयाला समूह विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. ही रयत सेवकासाठी आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात पारंपरिक शिक्षणाला कौशल्यपूर्ण शिक्षणाची व संशोधनाची  गरज आहे. ” असे विचार  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रमुख  प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे यांची सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल  शुभेच्छा समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत  होते. 
प्रमुख पाहुणे म्हणून  मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे म्हणाले की, ‘निगर्वी, संयमी, ज्ञानलालस, सूक्ष्मनिरीक्षक, मनमिळावू, सकारात्मक भूमिका असणारे सर्वगुणसंपन्न असे बचुटे आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. स्वतःचे मूल्य आणि तत्व घेऊन जगणारे आणि शब्दाला जागणारे असे आहेत. प्रामाणिकपणे काम करण्याची त्यांची वृत्ती आहे. या वृत्तीमुळेच ते आज प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.’  असे विचार व्यक्त केले. 
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य. बचुटे म्हणाले की, ‘रयत शिक्षण संस्थेमुळेच माझे कुटुंब आनंदी आहे. रयत लोकशाही संस्था आहे. संस्थेत काम करण्याची मोकळीक दिली जाते. मी प्रामाणिकपणे काम केले आहे. कर्मवीरांचे नातू डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला हे माझे भाग्य आहे.  ’
 यावेळी व्यासपीठावर प्राचार्य  डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे, सौ. मंजिरी बचुटे डॉ. बी. बी. शितोळे उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत  प्राचार्य  डॉ. अशोक भोईटे यांनी केले. डॉ. विकास कदम, डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. एस. एल. पडवळ आणि श्री. रामचंद्र बचुटे यांनी मनोगते व्यक्त केली.  सूत्रसंचालन प्रा. आर. ई. बावचकर  यांनी केले. आभार डॉ. बी. बी. शितोळे यांनी मानले. शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments