स्वा. सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Views
Views:
पंढरपूर / प्रतिनिधी 
  येथील स्वा. विनायक दामोदार सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकरांच्या पुर्णाकृती पुतळयांचे पुजन करण्यात आले. यावेळी पाकीस्तानवर भारतीय वायुसेनेने हल्ला केल्याबददल भारत माता की जय... अशा घोषणा देउन सारा परिसर सावरकर प्रेंमीनी दणाणून सोडला. 
  
         येथील सावरकरांच्या पुर्णाकृती पुतळयांचे पूजन आज सकाळी नउ वाजता सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष वा.ना.उत्पात , मर्चण्ट बॅकेचे चेअरमन नागेश भोसले , नगरसेवक अनिल अभंगराव , संग्राम अभ्यंकर , प्रकाश उत्पात, अभयसिंह इंचगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विवेक बेणारे , अरूण वाडेकर , नगरसेविका सुजाता बडवे , सुप्रिया डांगे , माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात , सचिन कुलकर्णी , अरूण वाडेकर , संजय अभ्यंकर , डॉ वर्षा काणे , मेधा दाते, मोहन मंगळवेढेकर आदि यावेळी उपस्थित होते. 
    
    प्रसंगी सावकरांचे पूजन झाल्यावर येथील आदर्श प्राथमिक विद्यालयांच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी ‘ जयोस्तुते ’ गीतांचे सादरीकरण केले. या संपूर्ण कार्यकमाच्या प्रारंभी बारा दिवसापूर्वी देशासाठी हौतात्म पत्करलेल्या 42 शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर आज देशाने पाकीस्तानवर हल्ला केलेल्या भारतीय वायुसेनेचे अभिनंदन आणि आनंदोत्सव झाला. यानिमित्ताने ‘ एक धक्का और दो.... पाकीस्तान तोड दो....’ अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमुन गेला होता. यावेळी बहुसंख्येने सावरकर प्रेंमी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश पडवळे , संतोष भोसेकर , सचिन चुंबळकर आदींनी परिश्रम घेतले . 

Post a Comment

0 Comments