शहीद जवानांच्या कुटूंबियांना मदत सार्वजनिक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा गौरवास्पद निर्णय

Views
Views:
पंढरपूरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुक खर्चाला फाटा देत शहीद जवानांच्या कुटूंबियांना मदत
सार्वजनिक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा गौरवास्पद निर्णय
शिवजयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे काढण्यात येणारी शिवप्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक रद्द करुन यासाठीच्या खर्चाला फाटा देत  हा निधी शहीद जवानांच्या कुटूंबियांना देण्याचा गौरवास्पद निर्णय सार्वजनिक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. अशी माहिती समितीने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 42भारतीय जवान शहीद झाले. या दुःखद घटनेमुळे सर्व देश हळहळला असून, देशभरात शोककळा पसरली होती. या हल्ल्यात देशासाठी प्राणाची बाजी लावणारे लढाऊ सैनिक आपण गमावले आहेत. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणं हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे यावर्षीची मिरवणुक रद्द करुन हा निधी शहीद जवानांच्या कुटूंबियांना देण्यात येणार आहे.

सार्वजनिक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध  समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून शिवजयंती साजरी करण्यात येते.  गेली तीन वर्षे शिवजयंती साजरी करून बहुजन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवण्याचे काम आम्ही केले जाते. यावर्षीही 18 तारखेला शिव जयंतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या  स्मारकासमोर दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शिवरायांच्या अश्वारुड पुतळ्याचे पूजन करून भव्य ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले, तसेच संध्याकाळी  शहिदांना मानवंदना देऊन देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 20 तारखेला महिला मेळावा व सायंकाळी नवोदित वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केले गेले. सकाळी भव्य रांगोळी स्पर्धा भरविण्यात आल्या. सायंकाळी प्रख्यात वक्ते मंगेश दहीहंडी यांचे व्याख्यान संपन्न झाले. रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. परंतु यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात भारत मातेचे 42 वीर जवान शहीद झाल्यामुळे संपुर्ण भारत देशावर दु:खाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षीप्रमाणे काढण्यात येणार्‍या शिवप्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक रद्द करण्यात येत असून सदर मिरवणुकीसाठी होणारा संभाव्य खर्च इतर सामाजिक उपक्रमासाठी व शहिदांच्या निधीसंदर्भात देण्याचा निर्णय सार्वजनिक मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीने घेतला आहे. लवकरच शासनाच्या निर्देशानुसार हा निधी शहीद जवानांच्या कुटूंबियांना सुपूर्त करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments