भारताचा पाकिस्तानवर बॉम्ब हल्ला

Views
Views:

  • पहा भारताच्या विमानांनी कसा केला पाकिस्तावर बॉम्बचा वर्षाव

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्डयांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या
हल्ल्यातील पाकिस्तानमधील बहुतांशी दहशवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सध्या, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. 

Post a Comment

0 Comments