मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात उमेदवार उभा करणार

Views
Views:
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक मराठा क्रांती मोर्चाने लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मराठा आपल्या विविध मागण्यांसाठी मोठं आंदोलन उभं केलं. मात्र या आंदोलनादरम्यान भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाने उघड नाराजी व्यक्त केली.
आगामी निवडणुकीत भाजपवर बहिष्कार घालणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चानं स्पष्ट केलं.  भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करु, अशी घोषणाही मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत केली. भाजप-शिवसेना युतीच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा उमेदवार उभे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments