पंढरपूर येथे उद्या वंचित बहुजन आघाडीची बैठक

Views
Views:
पंढरपूर :- वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व युवक आघाडीची बैठक उद्या दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर येथे होणार असून या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष मा. सुनिल वाघमारे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते, सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व रिपब्लिक होलार परिषदेचे अध्यक्ष मा. एस. के. ऐवळे मार्गदर्शन करणार आहेत.
सदर बैठकीमध्ये पंढरपूर तालुका आणि परिसरातील कामाचा आढावा घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.
बैठकीस पंढरपूर भारिपचे तालुका अध्यक्ष ऍड. सुरेश कांबळे, भारिपचे युवा जिल्हाध्यक्ष मा. सागर गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. बी. आर. भोसले, मा. सेवागिरी गोसावी, मा. श्रीकांत कसबे, राजकीय विश्लेषक प्रा. धैर्यशील भंडारे, भारिपचे शहर अध्यक्ष मा. प्रकाश दुपारगुडे, प्रा. रवींद्र रणदिवे उपस्थित असतील.
सदर बैठकीस वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष मा. योगेश मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments