स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार? माढ्यात 27 फेब्रुवारीला एल्गार मेळावा

Views
Views:
स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार? माढ्यात 27  फेब्रुवारीला एल्गार मेळावा
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीची चर्चा सुरु असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वबळावर लढण्याचे जवळपास निश्चित केले आहे.
कोल्हापूरमध्ये शुक्रवारी रात्री स्वाभिमानीची बैठक झाली. या बैठकीला खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजले  आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा, वर्धा मध्ये स्वाभिमानी उमेदवार देणार असून, येत्या 27 फेब्रुवारीला माढ्यामध्ये एल्गार मेळावा घेण्यात येणार आहे. 28 तारखेला राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात होणार आहे. राजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड? झाल्याची शक्यता आहे.  बुलडाणा, वर्धा जागेवर स्वाभिमानी संघटना ठाम आहे.

Post a Comment

0 Comments