पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील तिर्थक्षेत्र श्री भैरवनाथ देवस्थानाच्या विकास कामांसाठी रक्कम रू.02.00 कोटी निधी मंजूर

Views
Views:
आमदार श्री भारत भालके यांच्या प्रयत्नामुळे पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील तिर्थक्षेत्र श्री भैरवनाथ देवस्थानास ब वर्ग दर्जास मंजूरी

पंढरपूर दि.22 ः पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील तिर्थक्षेत्र श्री भैरवनाथ देवस्थानाच्या विकास कामांसाठी रक्कम रू.02.00 कोटी निधी मंजूर झाला असून ब वर्ग दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळविण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल भाविक वर्गांमधून समाधान व्यक्त होत आहे. 
            मौजे फुलचिंचोली गांवातील लोकांच्या मागणीनुसार आमदार श्री भालके यांनी या देवस्थानच्या विकासासाठी राज्य सरकारकडे ब वर्ग देवस्थान दर्जा मिळावा म्हणून पत्र व्यवहार करून त्याचा पाठपूरावा केलेला होता.  यामध्ये राज्य निकष समितीची दि.31 जानेवारी, 2019 रोजी बैठक झाली यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सचिव श्री असीम गुप्ता, उपसचिव श्री मनोज जाधव, कक्ष अधिकारी श्री तेलवेकर उपस्थित होते. या बैठकीत फुलचिंचोली देवस्थानचा ब वर्ग तिर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला असून दि.14 फेब्रूवारी रोजी मंजूरीचा आदेश पारीत करण्यात आला आहे. ब वर्ग दर्जामध्ये समावेश झाल्यामुळे या देवस्थानच्या विकास कामांसाठी रक्कम रू.02.00 कोटीचा निधी मिळणार असून यामधून श्री भैरवनाथ मंदिर परिसरातील सुशोभिकरण, पुरूष व महिलांसाठी भक्त निवास, शौचालय, वाहनतळ, हायमास्ट दिवे, संरक्षक भिंत, जोडरस्ता या सुविधा मिळणार असल्यामुळे या देवस्थानच्या भाविक भक्तांना सुखद आनंद मिळाला असून संपूर्ण गांवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार श्री भालके यांचे अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments